२१ वर्षांची केतकी जेव्हा क्लिनिकमधे आली तेव्हा ती रडुन रडुन आपल्या केसांच्या समस्या सांगु लागली, तीचा आत्मविश्वास सुद्धा यामुळे डळमळीत झाला होता. अयोग्य आहार, केसांची निगा न घेणे, जंक फुड/फास्ट फुड चा अतिरेक, तणाव, अपुरी झोप या सर्व कारणांनी तीचे केस अति प्रमाणात गळत होते व उरलेले केस देखिल रुक्ष, निस्तेज दिसत होते. संपुर्ण हिस्टरी व केस समजुन घेतल्या नंतर मी तीला आश्वस्त केलं. शिरोधारा सारखे काहिपंचकर्म व आयुर्वेदिक औषधींचा वापर करुन ३ महिन्यात तीचे केस गळणे थांबलेच, केस बळकट व चमकदार दिसु लागले. हसत हसत थँक्यु म्हणत ती क्लिनिक मधुन गेली व पुढच्या आठवड्यात तीच्या मैत्रीनीला ट्रीटमेंट साठी घेउन आली.
खरंच केस हे स्त्रीयांसाठी राणीच्या मुकुटाप्रमाणे असतात व ते स्त्रीयांच्या स्त्रीत्वाचे, सौन्दर्याचे व आत्मसन्मानाचे प्रतिक आहे असे मानले जाते. केस हे स्त्री व पुरुष दोन्हींमध्ये सौंदर्य व व्यक्तिमत्व वृद्धींगत करतात. म्हणुनच जेव्हा केसांचे आरोग्य बिघडुन ते गळु लागतात किंवा टक्कल पडते तेव्हा ते सौंदर्य, आत्मसन्मान व आत्मविश्वास यांना हानिकारक असतात. अकाली केस गळणे हे हल्ली सर्वच व्यक्तिंमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसुन येते. पुर्वी वयाच्या पन्नाशीनंतर अढळणार्या केसांच्या समस्या आजकाल ऎन २०- २१ वर्षाच्या तरुण / तरुणींमधे अढळुन येतात.
केसांच्या समस्यांचे व ते निरोगी ठेवन्याचे उपाय यांचे आयुर्वेदात सविस्तर वर्णन अढळते. आयुर्वेदात केस गळन्यास - खालित्य असे म्हटले जाते व याचे वर्णन शिरोरोगांमधे केले आहे. विकृत पित्त हे वातासोबत प्रकुपित होऊन केसांच्या मुळांना कमजोर करते व असे कमजोर केस गळु लागतात.
अकाली केस गळण्याची कारणे- (Causes of hair fall)
-अयोग्य आहार- आहारात पुरेशा पोषक तत्वांच्या अभावामुळे केसांच्या अरोग्यास आवश्यक जीवनसत्वे व प्रथिने मिळत नाहीत व परीणामी केस अशक्त होतात, रुक्ष होतात व गळु लागतात.
-चिंता/ तणाव- जास्त प्रमाणात मानसिक तणाव व चिंता हे दोघेही दैनंदीन जीवन, आहार, झोप, पचन तसेच हर्मोन्स व वात-पित्त-कफ यांचे संतुलन बिघडवन्यास कारणीभुत आहेत व यामुळे केस गळन्य़ाचे प्रमानही वाढते.
-प्रकृती- पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमधे केसांच्या पोषनास अडथळा लवकर येतो व केस लवकर गळतात व पांढरे होतात.
-आनुवंशिक- बर्याच पुरुषांमधे तसेच काही स्त्रीयांमध्ये देखिल केस गळणे, टक्कल पडणे हे अनुवंशिक असते. वडील- आजोबा यांना जर असेच टक्कल असेल तर अनुवंशिकतेमुळे ते मुलांमध्ये देखिल दिसुन येते.
-थायरॉइड विकार- थायरॉइड ग्रंथीच्या स्त्रावांचे प्रमाण कमी/ जास्त असेल तर शरिरात चय-अपचय योग्य होत नाही व अपुर्या पोषणामुळे केस रुक्ष, निस्तेज होऊन गळु लागतात.
-हेयर-डायचा अतिवापर- कृत्रिम व केमिकलयुक्त केश कलपांमुळे तसेच केमिकलयुक्त शाम्पु च्या अतिवापरामुळे देखिल केस गळण्याच्या प्रमाण वाढते.
-केसांवर अधिक प्रमाणात Ironing करणे यामुळे देखिल केसांच्या रचनेस धोका पोहोचुन ते कमजोर होऊन गळु लागतात. तसेच ऍनेमीया (हिमोग्लोबीन कमी असणे) , कॅल्सियमची कमी व केमोथेरपी मुळे देखिल केस गळतात.
- तणाव व चिंता टाळावी व त्यासाठी प्राणायाम/ य़ोगा व व्यायाम नियमितपणे करावे. तसेच शिरोधारा देखिल प्रभावी ठरते.
- आहाराची गुणवत्ता योग्य ठेवावी जेणेकरुन त्यात जास्तीत जास्त पौष्टीक पदार्थ असावेत. यामुळे शरीरास योग्य प्रमाणात जीवनसत्त्वे व प्रथिने मिळावीत जी केसांच्या निरोगी वाढीसाठी उपयुक्त आहे.
-आठवड्यातुन २ ते ३ वेळा केसांच्या मुळाशी कोमट आयुर्वेदीक तेलाने मालीश करावी. यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण वाढेल व योग्य पोषक तत्वे मिळुन केसांना बळकटी येइल.
- केमिकल्युक्त शाम्पु चा अतिवापर टाळावा त्याऎवजी कुठलाही हर्बल शाम्पु अथवा आवळा-शिकेकाइ-रिठा यांच्या मिश्रणाने आठवड्यातुन ३ ते ४ वेळा केस स्वच्छ करावेत.
- केसांवर जास्त गरम पाणी घेणे टाळावे त्याने केस कमजोर होतात. केस धुताना नेहमी अगदी कोमट पाण्याने किंवा साध्या पाण्याने धुवावेत.
- ओल्या केसांतुन कंगवा फिरवणे टाळावे त्याऎवजी जाड कंगवा अथवा बोटांनी केस सुटे करावे. तसेच ते कोरडे करण्यासाठी टॉवेल केसांवर रगडु नये त्याऎवजी हलकेच केसांवरील पाणी टॉवेल ने टिपुन घ्यावे व ते तसेच कोरडे होवु द्यावे.
- केस सुकवण्यासाठी हेयर ब्लोवर चा वापर, केस वरंवार ironing करणे, फॅशन म्हणुन केश कलपांचा वापर करणे हे सर्व टाळावे. यामुळे केस कमजोर होऊन लवकर गळु लागतात.
- महिन्यातुन एकदा केश कर्तन केल्याने केसांचे दुभंगलेले(Split heads) व मृत टोके(Dead heads) निघुन जातात व केसांची वाढ होण्यास मदत होते.
Komentáre