माइग्रेन व आयुर्वेद ( Migraine & Ayurveda)
-- डॉ.योगेशशिवाजी चव्हाण, एम.डी.(आयु.) केरळ.
आजकालच्याधकाधकीच्या व धावपळीच्यायुगात दैनंदिन जीवनातखुप सार्या डोकेदुखीकिंवा ताणतणाव भेडसवत असतातत्यातच भर म्हणुनकाही व्यक्तींच्या जीवनातमाइग्रेन नावाच्या डोकेदुखीचा भस्मासुरडोके वर काढुनउभा राहतो वअशी व्यक्ती सर्वबाजुंनी घेरली जाते. आधुनिकवैद्यकशास्त्रात या आजारावरपुरेसे उपाय नसल्यानेती व्यक्ती अजुनचअसहाय बनते. परंतुआयुर्वेद शास्त्राच्या मदतीने या माइग्रेननावाच्या भस्मासुराचा नक्कीच पराभव करतायेउ शकतो.
आयुर्वेद ग्रंथांमधे ११ प्रकारच्या शिरशुलाचे वर्णन व सविस्तर चिकित्सा सांगीतली आहे. अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या शिरशुलाचे american headache society ने प्राथमिक(Primary) व द्वितीयक (secondary-म्हणजेच इतर आजारांमुळे लक्षणस्वरुप दिसणारी डोकेदुखी) असे दोन प्रकारात वर्णन केले आहे. प्राथमिक शिरशुल देखिल जास्तवेळा माइग्रेन, क्लस्टर-डोकेदुखी व टेंशन-डोकेदुखी इ. कारणांमुळे होतो.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) जगातील ६ ते८% पुरुष व१२ ते १५% महीला या आजाराने ग्रस्त आहेत. वारंवार होनारी डोकेदुखी ही बर्याचदा दुर्लक्षामुळे किंवा चुकीच्या निदानामुळे वर्षानुवर्षे तशीच राहते, अशी डोकेदुखी माइग्रेन असन्याची दाट शक्यता असते व फक्त तात्पुरते वेदनाशामक औषधे घेतल्याने हा आजार अजुनच जुनाट व असाध्य होत जातो.
आयुर्वेदामध्ये या आजाराला अर्धावभेदकअसे म्हटले जातेव हा प्रामुख्यानेवात- पित्त यांचा शिरोभागी प्रकोप
झाल्याने होतो. आधुनिक वैद्यका नुसार हाआजार होन्याचे कारण स्पष्ट नाहीत, परंतु आयुर्वेद संहीता ग्रंथांनुसार खुप काळ धुरात राहणे, उन्हात खुप फिरणे, रात्री जागरण, मानसिक तणाव वचिंता, नैसर्गीक वेगांचा अवरोध व जास्त मद्यपान करणे अशा कारणांमुळे होऊ शकतो.
(What is Migraine in Marathi)
माईग्रेन हा आजारअटॅक स्वरुपात येतोव तो खुपसार्या लक्षणांचा समुह असुनत्यातील बरीचशी लक्षणे ही माइग्रेन चा शरीरातअटॅक आल्यावर दिसुन येतात. या अटॅकचा कालावधी हा४ तासांपासुन ७२तासांपर्यंतचा असु शकतो. या दरम्यान दिसणार्या लक्षणांमध्ये डोके दुखणे हे प्रमुख लक्षण दिसते परंतु१५ ते २०% माइग्रेन च्या रुग्नांमध्ये डोकेदुखी हे लक्षण दिसत नाही व फक्त इतर लक्षणे दिसतात.
या आजारात वेदना इतक्या प्रचंड प्रमाणात असतात की कुणी डोक्यात हतोडा कींवा घनाचे घाव घालतोय व डोक्याची कवटी फुटतेय तसेच जबड्याचा सांधा निखळतोय असा भास होतो.
माइग्रेन लक्षणे- (Symptoms Of Migraine Headache in Marathi)
- मध्यम ते तीव्र स्वरुपाचे अर्धे डोके दुखणे किंवा पुर्ण डोके दुखणे,
- मळमळ व ऊलटी, घाम येणे
- चक्कर, घबराहट, कामात बिलकुल लक्ष न लागणे
- कानात विचित्र आवाज होणे
- दृष्टी धुसर होणे, कुठलाही तीव्र वास सहण न होणे
- प्रकाश सहण न होणे
- कुठलाही आवाज देखिल सहण न होणे
ही लक्षणे साधारणत ४ ते ७२ तास शरीरावर दिसुन येतात व नंतर ती आपोआप नाहीशी होतात व रुग्न पुन्हा सामान्य होतो. असे माइग्रेन चे दौरे हे दिवसातुन एकदा किंवा जास्त वेळा देखिल येऊ शकतात परंतु ते महिन्यातुन१५ दिवसांपेक्षा कमी दिवसच येतात. या आजाराचे खात्रीशीर निदान कुठल्याहीतपासनी ने होऊ शकत नाही, सी.टी.स्कॅन कींवा एम्.आर. आय. मध्ये देखिल काहीच बदल दिसत नाहीत, म्हणुन माइग्रेन चे
निदान हे पुर्णत: क्लिनीकल हिस्टरी द्वारेच होते. परंतु मेंदुच्या इतर विकारांची शक्यता पडताळुन बघन्यासाठी या तपासण्या करणे गरजेचे असते.
Also Read : Weight Loss Diet for healthy weight loss
माइग्रेन दोन स्वरुपांत शरीरात व्यक्त होतो.
१. पुर्वरुपांसहीत (Migraine with aura)
२. पुर्वरुपांविरहीत ( Migraine without aura)
साधारणत: २०% माइग्रेनच्या रुग्नांमध्ये दौरा सुरु होण्याच्य अर्धा ते एकतास आगोदर माइग्रेन अटॅक ची पुर्वसुचना म्हणुन काही लक्षणे दिसु लागतात यामध्ये बेचैनी, थकवा, दृष्टी धुसर होणे, कानात आवाज होणे, चक्कर येणे, शरीराचा तोल जाणे, डोळ्यांसमोर नसलेली प्रकाशित वस्तुदिसणे या लक्षणांचा समावेश होतो. या लक्षणांच्या अर्धा ते एक तासानंतर डोकेदुखी इ.लक्षणे दिसतात. खुप काळ हा आजार असणार्या रुग्नांना पुर्वरुप (aura) दिसु लागल्यावर पुढील अटॅक ची पुर्वकल्पना येते व त्यामुळे चिंता व घबराहट अजुन जास्त वाढुन त्रास अधिक वाढतो.
पुर्वरुपांविरहीत माइग्रेन मध्ये अटॅक हा कुठलीही पुर्वसुचना न देता अचानक सुरु होतो व ४ ते७२ तासांपर्यंत टीकुशकतो.
माइग्रेन आयुर्वेद उपचार- (Ayurvedic Treatment for Migraine in Marathi)
ऍलोपॅथीनुसार या आजारावर काही वेदनाशामक व ट्रायसायक्लिक प्रकारची अँटीडीप्रेसंट औषधे वापरली जातात. परंतु ही महागडी औषधे त्यांची किंमत तसेच साइडइफेक्ट्स बघता खुप काळ घेणे योग्य नाही.
आयुर्वेदीक औषधांनी हा आजार मुळापासुन जाऊ शकतो परंतु यासाठी पथ्य, औषधी, प्राणायाम व संयम यांच्या अग्निदीव्यातुन जाणे गरजेचे असते.
आयुर्वेदानुसार वात व पित्ताच्या झालेल्या प्रकोपाचा उपचार करताना लसुन, चित्रक, भृंगराज, आर्द्रक, पिंपळी या सारख्या वनस्पतींचा योग्य प्रमानात उपयोग केला जातो, तसेच काही औषधी भस्मदेखिल या आजारावर अत्यंत प्रभावीपणे काम करतात. या सोबतच काही पंचकर्म करणे देखिल गरजेचे असते, यात विरेचन, शिरोधारा, तक्रधारा, शिरोबस्ती, नस्य यांचा समावेश होतो.
तसेच अनुलोम विलोम वत्राटक यांसारखे प्राणायाम देखिल चिकीत्सेला सहायक ठरतात.
तसेच आहार-विहाराचे काही पथ्य पाळणे देखिल गरजेचे असते.
माइग्रेन अपथ्य - (Diet for Migraine in Marathi)
हा आजार पित्त व वाताचा कफस्थानी प्रकोप झाल्याने होतो म्हणुन साधारणत: पित्त वा वात वाढवणारे बहुतांश पदार्थ आहरातुन वर्ज्य करावेत.
- जास्त फॅट्स् युक्त आहार, तळलेले व अंबट सर्व पदार्थ
- थंड पदार्थ, कोरडे कींवा रुक्ष पदार्थ, उन्हात फीरणे
- पुर्वेकडुन येणारे वारे जास्त अंगावर घेणे ( मोटर सायकलच्या प्रवासात)
- खुप वेळ पाण्यात पोहणे
- रात्री जागरण करणे
- उपवास, अवेळी जेवण करणे
- नैसर्गिक वेगांचा (मल, मुत्र, शिंक इ.) अवरोध करणे
- चिंता व तणावयुक्त वातावरण
- खुप मद्यपान करणॆ
- धुम्रपान, तंबाखु इ. व्यसन
Comments