७ लोकप्रिय वजन कमी करण्याचे आहार
7 Famous Weight Loss Diet in Marathi
वजन कमी करण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार होतात, वेगवेगळे डायट, झुंबा, एरोबिक्स, जिम, कार्डिओ; परंतु यातील फार थोड्या व्यक्ती वजन कमी करण्यात यशस्वी होतात. चुकिचा सल्ला, मोटिवेशन चा व योग्य मार्गदर्शनाचा अभाव असे अनेक कारणे त्यासाठी आहेत. जे वजन कमी करण्यात यशस्वी होतात त्यातील ५० % लोकांचे वजन हे डायट व व्यायाम कमी केल्यावर पुन्हा वाढु लागते व खुपच कमी व्यक्तिंचे हेल्थी वेट लॉस होते.
हेल्थी वेट लॉस म्हणजे कुठल्याही दुष्परीणामांशिवाय व पुन्हा न वाढणारा असा वेट लॉस. वजन कमी करण्याची त्रिसुत्री म्हणजे योग्य आहार, व्यायाम व चयापचय प्रक्रिया योग्य करण्यासाठी हर्बल औषधी. यासाठी मार्गदर्शनासोबत मोटिवेशन ची खुप आवश्यकता असते.
वजन कमी करण्यात आहाराचा खुप मोठा रोल आहे.
वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या आहार पद्धती अस्तित्वात आहेत. परंतु व्यक्तीनुसार याचे फायदे बदलत असतात. तुम्हाला कुठली आहार पद्धती योग्य व फायदेशीर ठरेल हे योग्य तज्ञाच्या मार्गदर्शनाने ठरवुन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावी.
काही व्यक्ती आपली भूक कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात तर काही लोक कॅलरी, कार्ब किंवा चरबी प्रतिबंधित आहारचे सेवन करतात.
यात सर्वांनीच आपली आहार पद्धती श्रेष्ठ असल्याचा दावा केल्याने, कुणी कोणती आहार पद्धती अवलंबावी हे जाणून घेणे कठीण आहे.
खरे पाहिले तर कोणताही आहार प्रत्येकासाठी सर्वोत्तम नाही. एखादी आहार पद्धती तुमच्यासाठी चांगली ठरु शकते परंतु ती दुसर्यासाठी उपयुक्त ठरेलच असे नाही.
या लेखात ७ सर्वात लोकप्रिय वजन कमी करण्याच्या आहार पद्धती आणि त्यामागील विज्ञानाचे पुनरावलोकन केले आहे.
1. पॅलिओ आहार (Paleo Diet)
पॅलिओ आहार पद्धती असे सांगते की आपला आहार हा शेतीतंत्र विकसित होण्यापुर्वीचा आदिमानवाप्रमाणे असावा. यात असे सांगितले जाते कि तुमचा आहार हा कुठलीही प्रक्रिया न केलेला, शेतीमध्ये न उगवलेला कच्चा असावा.
या मागील सिद्धांत असा आहे की बहुतेक आधुनिक रोगांचे कारण हे पाश्चात्य आहार, जंक/ फास्ट फुड, धान्य, डेअरी प्रॉडक्ट आणि प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ आहेत. या आहारात प्रयुक्त पदार्थ हे खरेच आदि मानव किंवा शेती तंत्र विकसीत होण्यापुर्वीच्या मानवाने खाल्लेल्या आहाराप्रमाणेच आहे यात काहि शंकाच आहेत, परंतु ही आहार पद्धती अनेक रोगांमधे प्रभावीपणे काम करते.
हि आहार पद्धती कसे कार्य करते: (How Paleo Diet Works) :
पॅलिओ आहार हा प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर, डेअरी प्रॉडक्ट आणि धान्य हे सर्व वर्ज्य करुन संपूर्ण अन्न पातळ प्रथिने, नैसर्गिक उगवलेल्या पालेभज्या, फळ भाज्या, कंदमुळे, फळे, शेंगदाणे आणि बियाण्यांवर जोर देतो.
पॅलिओ डाएटच्या आणखी काही लवचिक आवृत्त्या पनीर आणि बटर सारख्या दुग्धजन्य पदार्थ तसेच बटाटे आणि गोड बटाटे (रताळी) यासारख्या कंदांना देखील परवानगी देतात.
Paleo Diet for Weight loss :
अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की पॅलेओ आहारामुळे वजन कमी होऊ शकते आणि कंबरेचा घेर देखिल कमी होऊ शकतो.
यामधे पॅलिओ डाएट करणारे पॅलेओ डायटर्स दररोज कमी कार्बोहायड्रेट, अधिक प्रथिने आणि 300-900 पर्यंत कमी कॅलरीयुक्त आहार खातात.
पॅलिओ डाएटचे इतर फायदेः (Benefits of Paleo Diet)
- कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, ट्रायग्लिसरायड्स आणि रक्तदाब यासारख्या हृदयरोगासाठी जोखीमा कमी करण्यासाठी हा आहार प्रभावी असल्याचे दिसते.
नकारात्मक परिणामः (Adverse effects of Paleo Diet)
यात धान्य, दुग्ध जन्य पदार्थ यांसारखे अनेक पौष्टीक पदार्थ आहारतुन वर्ज्य करावे लागतात व आहारावर अनेक प्रतिबंध येतात. त्यमुळे या आहाराचे पालन करणे अतिशय कठीण होते.
Also Read : Fast Weight loss treatment and Weight loss Tips
2. vegan diet - शाकाहारी आहार
vegan diet / शाकाहारी आहारामधे सर्व प्राणीज उत्पादनांच्या सेवनास वर्ज्य केले जाते या आहारामागे नैतीक, पर्यावरणीय व शारीरिक आरोग्य हे सर्व उद्देश आहेत. हा आहार प्राण्यांचे शोषण आणि क्रूरतेच्या प्रतिकाराशी संबंधित आहे. vegan diet हा शाकाहाराची अत्युच्च पातळी आहे.
ही शाकाहारी पद्धती ही आपल्या कडील शाकाहारप्रमाणे नाही. यात मांस, मटन, मासे, मध, दुध, अंडी असे सर्वच प्राणीज आहार द्रव्यांवर प्रतिबंध तर केला जातो पण आहारात कमी शीजवलेला प्रक्रिया विरहीत असा नैसर्गिक आहार सेवन केला जातो.
वजन कमी करण्याच्या दृष्टीने शाकाहार खूपच प्रभावी असल्याचे दिसून येते - बहुतेकदा कॅलरीची मोजणी न करता देखिल शरीरातील अतिरिक्त चरबी यात बर्न होते कारण त्यातील कमी चरबी आणि जास्त फायबर युक्त आहार हा शरीरातील अतिरिक्त उर्जेच्या स्त्रोतास म्हणजेच चरबीस उर्जेमधे रुपांतरीत करतो. परंतु आज कालच्या प्रक्रियायुक्त आहार तसेच किटकनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळे असा आहार पालन करणे व त्याचा
शरीरास फायदे होण्यास काहिसा अडथळा येतो.
असा आहार सेवन करणार्यांच्या शरीरात अनेकदा ब- जीवनसत्व, व्हिटॅमिन डी 3, लोह, कॅल्शिअम, ओमेगा3 फॅटी ॲसिड या घटकांची कमतरता दिसुन येते.
इतर फायदेः( Benefits of Vegan Diet)
वनस्पती-आधारित vegan diet हा हृदयरोग, टाइप 2 मधुमेह आणि अकाली मृत्यूच्या धोक्याची पातळी कमी करतो.
प्रक्रिया केलेले मांस व आहार सेवन बंद केल्याने अल्झायमर रोग होण्याचा धोका आणि हृदय रोग किंवा कर्करोगाचा धोका देखिल कमी होऊ शकतो.
Consult Online with Dr.Yogesh Chavan- Book Appointment
3. Low-carb diet / लो-कार्ब आहार/ कमी कर्बोदकेयुक्त आहार -
लो-कार्ब आहार अनेक दशकांपासून लोकप्रिय आहे, विशेषत: वजन कमी करण्यासाठी जास्तच लोकप्रिय आहे.
कमी कार्ब आहारांचे अनेक प्रकार आहेत, परंतु सर्वांमधे दररोजच्या आहारात 20 ते 150 ग्रॅम कार्बचे सेवन मर्यादित करणे समाविष्ट आहे.
शरीरात उर्जेचा मुख्य स्त्रोत हा कर्बोदके हा आहे पण या आहार पद्धती मधे आपल्या शरीराला उर्जेचा मुख्य स्त्रोत म्हणून कार्ब वापरण्याऐवजी इंधनासाठी शरीरातील अतिरिक्त चरबी वापरण्यास भाग पाडणे हे या आहाराचे मुख्य उद्दीष्ट आहे.
हे कसे कार्य करते: (How Low Carb Diet works)
या आहारात आपल्या रोजच्या जेवनात कार्बचे सेवन कठोरपणे मर्यादित करुन आहारात प्रोटीन, फॅट व फायबर यांचा जास्त वापर केला जातो. जेव्हा कार्बचे सेवन कमी होते, तेव्हा फॅटी ॲसिड आपल्या रक्तात स्थानांतरित केले जातात आणि ते आपल्या यकृताकडे जातात, त्यातील काही केटोन्स (ketones) मध्ये रुपांतरीत केले जातात.
कार्ब नसतानाही आपले शरीर उर्जाचा मुख्य स्रोत म्हणून फॅटी ॲसिडस् आणि केटोन्स वापरू शकते.
Weight loss with Low Carb Diet :
अनेक अभ्यासानुसार असे सूचित होते की लो-कार्ब आहार वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, विशेषत: जास्त वजन आणि लठ्ठ व्यक्तींमध्ये हा आहार अतिशय उपयुक्त आहे.
असा आहार आपल्या अवयवांच्या आसपास जमा होणारी धोकादायक चरबी व पोटाची चरबी कमी करण्यात खूप प्रभावी असल्याचे अढलले आहे.
अत्यंत कमी कार्बयुक्त आहार घेतलेले लोक सामान्यत: केटोसिस नावाच्या चयपचयाच्या स्टेट मध्ये पोहोचतात. या अवस्थेमधे शरीरात उर्जेचा मुख्य स्त्रोत हा फॅट असतो यामुळे शरीरातील चरबी कमी होते व शरीर अधिकच हलके व ॲक्टीव बनते. अनेक स्टडीज मधे असे सापडले आहे की केटोजेनिक आहार हा इतर कमी चरबीयुक्त, कॅलरी-प्रतिबंधित आहारापेक्षा दुप्पट वजन कमी करतो.
इतर फायदेः (benefits of Low Carb Diet)
लो-कार्ब आहारामुळे आपली भूक कमी होते आणि आपल्याला कमी भूक लागते, ज्यामुळे कॅलरीचे प्रमाण आपोआप कमी होते.
याशिवाय कमी कार्ब आहारामुळे रक्तातील ट्रायग्लिसेराइड्स, कोलेस्ट्रॉलची पातळी, रक्तातील साखरेची पातळी, मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या अनेक मोठ्या आजाराचे धोके कमी होतात.
नकारात्मक बाजू: (Adverse Effects of Low Carb Diet))
लो-कार्ब आहार प्रत्येकास अनुकूल नाही. काहींना त्याचे अतिशय वाईट परीणाम दिसुन येतात. शाकाहारी व्यक्तिंना असा आहार पाळणे अतिशय अवघड असते, कारण शकाहारातील सर्वच पदर्थांमधे काही अंशी कार्ब असतात. काही लोकांमधे जास्त फॅट युक्त आहारामुळे शरीरास घातक एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढीचा अनुभव येऊ शकतो.
अत्यंत क्वचित प्रसंगी, अगदी कमी कार्बयुक्त आहारांमुळे नॉन डाएबेटिक केटो-ॲसीडोसिस नावाची गंभीर स्थिती उद्भवू शकते. स्तनपान करणार्या महिलांमध्ये ही स्थिती अधिक दिसुन येते आणि उपचार न करता सोडल्यास ते प्राणघातक ठरू शकते.
तथापि, लो-कार्ब आहार बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आहे. फक्त तो योग्य मार्गदर्शनाखाली घ्यावा.
4. The Dukan diet / द ड्युकन डाएट -
डूकन आहार हा एक उच्च-प्रथिने, कमी कार्ब असलेला वजन कमी करण्याच आहार आहे. या आहाराच्य 4 स्टेजमधे विभाजन होते. दोन वजन कमी करण्याचे टप्पे आणि दोन देखभाल (maintenance) टप्पे.
आपण प्रत्येक टप्प्यात किती दिवस/ वेळ रहाल हे आपल्या वजन कमी करण्याच्या उद्दिष्टावर अवलंबून असते.
प्रत्येक टप्प्यात आहाराची विशिष्ट पद्धती असते.
हे कसे कार्य करते: (How Dukan Diet Works) :
वजन कमी करण्याचे टप्पे मुख्यत्वे जास्त प्रमाणात उच्च-प्रोटीनयुक्त पदार्थ आणि अनिवार्य ओट ब्रॅन (oat bran) खाण्यावर आधारित आहेत.
इतर टप्प्यामध्ये स्टार्च (कार्ब चा दुसरा प्रकार) नसलेल्या भाज्या आहारात समाविष्ट केल्या जातात त्यानंतर काही कार्ब आणि फॅट आहारात घेतल्या जातात. नंतर, शेवटच्या टप्प्यात आपले नवीन कमी झालेले वजन कायम ठेवण्यासाठी अतिशय कमी शुद्ध प्रथिने असलेला आहार घेतला जातो.
एका अभ्यासानुसार, डुकनच्या डाएट पालन करणार्या महिलांनी दररोज सुमारे 1000 कॅलरी आणि 100 ग्रॅम प्रथिने खाल्ली तर 8-10 आठवड्यांमध्ये सरासरी 10 ते 12 किलो वजन कमी केले.
या आहारामुळे चयापचय दर वाढतो व भुकेशी निगडीत हार्मोन ’ghrelin’ मधे कमतरता येते
डूकन आहार चरबी आणि कार्ब्स दोन्ही मर्यादित करते व हा आहार शास्त्रशुद्ध नाही पण परीणामी आहे.
यात तिव्र झालेल्या चयपचयामुळे व तीव्र कॅलरी निर्बंधामुळे वजन कमी होण्यासोबत शरीरातील स्नायूंचे देखिल लक्षणीय नुकसान होऊ शकते.
स्नायूंच्या वस्तुमानाचे कमी होणे आणि तीव्र उष्मांक निर्बंधामुळे आपल्या शरीरात ऊर्जा संचयित होऊ शकते व त्यामुळे कमी झालेले वजन सहजगत्या पुन्हा वाढु शकते.
5. Ultra-low-fat diet / अल्ट्रा-लो-फॅट आहार -
अल्प-चरबीयुक्त आहार आपल्या रोजच्या आहरातील चरबीच्या वापरास 10% कॅलरीज पर्यंत मर्यादित करतो.
सामान्यत: कमी चरबीयुक्त आहार अंदाजे 30% कॅलरी या फॅट च्या माध्यमातुन प्रदान करतो.
काही अभ्यासानुसार असे दिसून येते की दीर्घकालीन वजन कमी करण्यासाठी हा आहार योग्य नाही.
अल्ट्रा-लो-फॅट फॅट आहाराचे समर्थक असा दावा करतात की पारंपारिक कमी फॅट/ चरबीयुक्त आहार हा खरोखर फॅट ने कमी प्रमाणात नसतो आणि आरोग्यासाठी फायदे आणि वजन कमी करण्यासाठी चरबीचे सेवन एकूण कॅलरीच्या 10% पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
हे कसे कार्य करते: (How Ultra-low-fat diet works)
अति-चरबीयुक्त आहारात चरबीपासून 10% किंवा कमी कॅलरी शरीरास मिळतात. असा आहार हा बहुधा वनस्पती-आधारित असतो आणि यात प्राणीज उत्पादनांचा वापर अतिशय मर्यादित असतो.
म्हणून या आहरात कार्बचे प्रमाण हे साधारणत: खूपच जास्त असते - सुमारे 80% कॅलरी - आणि प्रथिने कमी - 10% कॅलरी इतके असते.
वजन कमी करणे: लठ्ठ व्यक्तींमध्ये वजन कमी करण्यासाठी हा आहार खूप यशस्वी सिद्ध झाला आहे. एका 8 आठवड्यांच्या स्टडीमधे असे अढळुन आले आहे की हा आहार म्हनजे 7 ते 14 % फॅट्युक्त आहार घेणारयांमधे 8 आठवड्यांमधे सरासरी 7 ते 8 किलो वजन कमी झाले.
इतर फायदे : (Benefits of Ultra low fat diet)
अभ्यासानुसार अति-कमी चरबीयुक्त आहार उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल यासह हृदयरोगासाठी अनेक जोखमीना कमी करु शकतो.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा उच्च-कार्ब, कमी चरबीयुक्त आहार टाइप 2 मधुमेह मध्ये देखील लक्षणीय सुधारणा घडवून आणू शकतो.
नकारात्मक परिणामः (Adverse Effects of Ultra Low fat diet)
चरबीच्या प्रतिबंधामुळे दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात, कारण चरबी आपल्या शरीरात बर्याच महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, यात पेशींची बाहेरील भिंत(cell membranes) आणि संप्रेरक(hormones) तयार करण्यात मदत करणे तसेच आपल्या शरीरास फॅट मधे विरघळणारे जीवनसत्त्वे शोषण्यास मदत करणे देखील समाविष्ट आहे.
शिवाय, अत्यल्प-कमी चरबीयुक्त आहार बर्याच सकस आहार पदार्थांचे सेवन मर्यादित करतो, तसेच यात विविधता नसते त्यामुळे असा आहार जास्त दिवस करणे अत्यंत कठीण असते.
6. अॅटकिन्स आहार ( Atkins Diet)
अॅटकिन्स आहार हा सर्वात सुप्रसिद्ध कमी-कार्ब वजन कमी करणारा आहार आहे.
Dr. Robert C. Atkins यानी सुरु केलेली ही आहार पद्धती १९७२ मध्ये पुस्तक रुपात प्रसिद्ध केली व त्या नंतर हा आहार खुपच प्रसिद्ध झाला.
यात सर ॲट्किन्स असा दावा करतात की तुम्ही आहारात हवे तेवढे प्रोटीन व फॅट्स खाउनही वजन कमी करु शकतात फक्त कार्ब टाळणे ही एकच यात अट आहे.
कमी-कार्ब आहार वजन कमी करण्यासाठी इतके प्रभावी का आहे याचे मुख्य कारण ते आपली भूक कमी करतात. व यामुळे आहारात न कळत कमी कॅलरी घेतल्या जातात.
हे कसे कार्य करते: (How Atkins diet works)
अॅटकिन्स आहार चार टप्प्यात विभागलेला आहे. हा आहार ’इंडक्शन’ टप्प्यापासून () सुरू होतो, त्या दरम्यान आपणास दररोज 20 ग्रॅम कार्ब्स खाण्याची अनुमती असते ही फेज दोन आठवड्यांसाठी असते. यात शरीरातील मुख्य उर्जेचा स्त्रोत कार्ब वरुन बदलुन फॅट्स केला जातो व याने शरीर एक फॅट जाळणार्या यंत्रात परीवर्तीत होते.
इतर टप्प्यांत हळूहळू निरोगी कार्बयुक्त आहारास पुन्हा आपल्या आहारात परत आणणे समाविष्ट आहे.
वजन कमी करण्याचे उद्दीष्ट पुर्ण झाल्यावर हळु हळु थोडे थोडे कार्ब वाढवुन ते इतक्या प्रमाणात ठेवले जातात की त्याने पुन्हा वजन वाढणार नाही. या शेवटच्या टप्प्याला मेंटेनन्स फेज म्हटले जाते.
वजन कमी करन्यासाठी महत्व : (Weight loss by Atkins Diet)
ॲटकिन्स आहाराचा विस्तृत पणे परीणाम पाहिल्यास हा आहार इतर आहार पद्धती पेक्षा अधिक वेगाने वजन कमी करत असल्याचे आढळले आहे.
इतर अभ्यासात असे लक्षात आले आहे की वजन कमी करण्यासाठी लो-कार्ब आहार खूप उपयुक्त आहे. ते पोटावरील चरबी कमी करण्यात विशेषत: यशस्वी आहेत, सर्वात उशीरा कमी होणारी पोटातील पोकळीमधील चरबी देखिल या आहाराने लवकर कमी होण्यास मदत होते.
इतर फायदेः (Benefits of Atkins Diet)
असंख्य अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की ॲटकिन्स आहार हा इतर कमी कार्ब असलेल्या आहाराप्रमाणे रक्तातील ट्रायग्लिसरायड्स, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, इन्सुलिन आणि रक्तदाब या आजाराच्या अनेक जोखमीचे घटक कमी करू शकतो.
नकारात्मक परिणामः(Adverse Effects of Atkins Diet)
इतर अगदी कमी कार्ब आहारांप्रमाणेच अॅटकिन्स आहार बर्याच लोकांसाठी सुरक्षित आणि निरोगी असतो परंतु क्वचित प्रसंगी समस्या उद्भवू शकतात. या आहाराच्या सुरुवातीला थकवा, डोकेदुखी असे लक्षणे असलेला केटो- फ्लु बर्याच व्यक्तीन्ना सहन होत नाही.
अॅटकिन्स आहार हा एक कमी कार्ब असलेला वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहार आहे सोबतच इतर आजारांसाठी कारणीभुत जोखमीच्या घटकांना देखिल हा आहार कमी करतो.
७. इंटरमिटेंट फास्टिंग/ अधूनमधून उपवास (Intermittent Fasting)
अधूनमधून उपवास करणे यालाच इंटरमिटेंट फास्टिंग म्हटले जाते यामधे काहि कालावधी पुर्ण उपवास आणि काही कालावधी नियमीत आहाराचे चक्र सुरु असते.
या आहार पद्धतीमधे कुठल्याही आहार पदार्थांवर नियंत्रन ठेवण्यापेक्षा आहाराच्या कालावधी वर नियंत्रन ठेवले जाते.
इंटरमिटेंट फास्टिंग किंवा मधूनमधून उपवास करण्याचे सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजेः
- The 16/8 method- 16/8 पद्धतः
या आहार पद्धती मधे नाष्ता वगळला जातो व आपल्या रोजच्या खाण्याचा कालावधी आठ तासांवर मर्यादित ठेवला जातो, त्यानंतर दिवसातील उर्वरित 16 तास उपवास करणे यात समाविष्ट आहे. जर सकाळी ११ वाजता तुम्ही आहार घेतला तर रात्रीचा आहार ७ वाजेच्या आत घ्यावा व ७ वाजेनंतर दुसर्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत काहीही खाउ नये व पाण्याव्यतिरीक्त कुठेलेही पेय घेउ नये.
- The eat-stop-eat method –
या पद्धती मधे आठवड्यातुन एकदा किंवा दोन वेळा २४ तासांचा काहीही न खाता उपवास करने अपेक्षित असते. आठवड्यातुन २ वेळा सलग न करता १ किंवा २ दिवसाच्या अंतराने असा उपवास केला जातो.
- The 5:2 diet - ५: २ आहार:
आठवड्याच्या दोन दिवस फक्त ५०० ते ६०० कॅलरी उर्जा असलेला आहार घेणे या पद्धती मधे सामाविष्ट आहे. असे ५०० ते ६०० कॅलरी आहारचे दिवस सलग नसावेत. उर्वरित पाच दिवस आपण आहरात सर्व काही खाउ शकतो.
- The Warrior Diet - वॉरियर डाएट:
या आहार पद्धती मधे दिवसा कमी प्रमाणात कच्चे फळ आणि भाज्या खाने अपेक्षित असते आणि रात्रीचे जेवण पोटभर कले जाते.
हे कसे कार्य करते: (How Intermittent Fdasting works)
Intermittent Fasting / अधूनमधून उपवास सामान्यतः वजन कमी करण्यासाठी सोपा कॅलरी प्रतिबंधीत आहाराचा प्रकार आहे. यात बर्याचदा कॅलरी मोजण्याची किंवा आहार कुठला घ्यावा याचा जास्त विचार करण्याची गरज नसते यामुळे ही पद्धती तुलनेने सोपी आहे.
ही आहार पद्धती आपल्याला एकूणच कमी कॅलरी खाण्यास प्रवृत्त करते. फक्त कमी खाल्लेल्या आहाराची भरपाइ इतर उपवास नसलेल्या दिवसांत करु नये.
वजन कमी करणे: (Weight loss by Intermittent fasting)
वजन कमी करण्यासाठी सामान्यत: मधूनमधून उपवास करणे ही पद्धत अत्यंत यशस्वी आहे. ३ ते २४ आठवड्यांच्या कालावधीत या आहाराने शरीराचे 3-8% वजन कमी होते असे अढळले आहे, जे इतर वजन कमी करण्याच्या आहाराच्या तुलनेत बरेच चांगले आहे.
कमी कॅलरीयुक्त इतर आहाराच्या तुलनेत या आहाराने शरीरातील स्नायुंचा र्हास (muscle loss) कमी प्रमाणात होतो, तसेच हा आहार अल्पावधीत आपल्या चयापचय दरात ३.६% ते १४% इतकी वाढ करु शकतो.
इतर फायदे: (Benefits of Intermittent fasting)
अधूनमधून उपवास केल्याने शरीरातील सुज, कोलेस्टेरॉलची पातळी, रक्तातील ट्रायग्लिसेराइड्स आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.
शिवाय, नियमितपणे उपवास केल्याने human growth hormone (HGH) ची पातळी वाढते व इंसुलिनची संवेदनशीलता वाढने, पेशी दुरुस्ती प्रक्रिया देखिल वाढते.
दुष्परिणाम: (Adverse Effects of Intermittent fasting)
intermittent fasting / मधून मधून उपवास करणे हे निरोगी लोकांसाठी सुरक्षित असले तरी ते सर्वांना अनुकूल नाही. काही अभ्यासात असे अढळुन आले आहे की ही आहार पद्धती स्त्रियांसाठी तितकी फायदेशीर नाही जितकी ते पुरुषांसाठी आहे.
याव्यतिरिक्त, खालील व्यक्तींनी असा उपवास करणे टाळावे – (Who should avoid Intermittent fasting)
रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होणारे, गर्भवती महिला, स्तनपान करणारी माता, किशोर, मुले आणि कुपोषित, वजन कमी किंवा पौष्टिकतेची कमतरता असलेले लोक यांनी असा उपवास करणे टाळले पाहिजे.
असे हे लोकप्रिय ७ आहाराचे प्रकार वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत, परंतु तज्ञांचे योग्य मार्गदर्शन, व्यायाम व नियमीत प्रेरणा (Motivation) भेटणे अतिशय आवश्यक आहे.
आपणही वजन कमी करण्यास इच्छुक असाल तर तज्ञ व्यक्तिंच्या मार्गदर्शना खाली करावे कारण वजन कमी केल्यानंतर मेंटेनन्स फेज म्हनजे ते वजन तसेच टिकवणे देखिल तितकेच महत्वाचे असते.
Comments