top of page
Search

गाउट/ वातरक्त : आयुर्वेदीक दृष्टिकोन (Gouty Arthritis - Ayurvedic Treatment)


Gout - Arthritis Ayurvedic treatmen tin nashik

 

शरिरात जेव्हा रक्तातले युरिक ऍसिड चे प्रमाण वाढते तेव्हा त्या स्थितीला गाउट किंवा युरिक ऍसिड चा त्रास असे म्हटले जाते, यालाच आयुर्वेदात वातरक्त असे संबोधले जाते. वातरक्त हा २- ३ % लोकांमध्ये अढळुन येनारा सांधेदुखीचा एक सामान्य प्रकार आहे. हल्लीच्या धावपळीच्या व बदललेल्या जिवनशैलिच्या युगात याचे प्रमाण हळु हळु वाढतच आहे.

जेव्हा आहारात खाल्लेल्या प्रोटीन्स मधील प्युरीन या तत्वाचे शरीरात योग्य चय-अपचय होत नाही तेव्हा त्यापासुन जास्त प्रमाणात मोनोसोडीयम युरेट (युरीक ऍसिड) तयार होते व रक्तातील युरिक ऍसिड चे प्रमाण हे ६.८ mg/dl पेक्षा वाढते, तेव्हा त्याचे सुक्ष्म स्फटिक रुपात परिवर्तन होऊन ते शरिरातील सर्व सांधे व सांध्यांच्या जवळील भागात जमा होतात.  असे जमा झालेले सुक्ष्म स्फटीक सांध्याच्या नियमित हलचालींमध्ये बाधा आनतात व त्या ठिकाणी वेदना, लालसरपणा, सुज, दाह व स्पर्शासहत्व अशी लक्षणे निर्माण करतात. या आजाराच्य सुरुवातीच्या स्थितीत जेव्हा नुकतीच युरिक ऍसिड ची पातळी वाढु लागते तेव्हा रुग्नास कुठलेही लक्षणे दिसत नाही. परंतु नंतरच्या काळात जेव्हा ते स्फटीक सांध्यांमध्ये जमा होऊ लागतात त्या नंतर लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. यात होणार्या वेदना या अतिशय तीव्र स्वरुपाच्या असतात, आयुर्वेद ग्रंथांमध्ये त्यांची तुलना विंचु च्या दंशासोबत केली आहे. पन्नाशी च्या वरच्या पुरुषांमधील सांधेदुखीचे चे प्रमुख कारण हेच असु शकते, स्त्रीयांमध्ये या आजाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी अढळुन येते.

आयुर्वेदानुसार वातरक्त हा दोन प्रकारचा असतो, जेव्हा त्वचा व मांस धातु ची दुष्टी झालेली असते तेव्हा यास उत्तान वातरक्त (uncomplicated gout) म्हटले जाते. व जेव्हा अगदी आतील धातु म्हणजेच अस्थी, सन्धी, स्नायु, कंडरा (ligament) यामध्ये वातरक्त निर्माण होतो तेव्हा त्यास गंभीर वातरक्त (complicated gout ) असे म्हणतात.

या आजारात प्रामुख्याने दिसुन येनारी लक्षणे-

- सुरुवातीला छोट्या सांध्याच्या ठीकाणी व नंतर मोठ्या सांध्यांच्या ठीकाणी तीव्र वेदना

- सांध्याच्या वर लालसर पणा व सुज

- सांध्यांच्या आत दाह,  स्पर्श देखिल सहन न होणे

- नंतरच्या अवस्थेत बोटांवर युरिक ऍसिड्च्या गाठी तयार होणे

 

उपचार-

आधुनिक वैद्यक्शास्त्रानुसार या विकारात प्रकारची वेदनाशामक औषधी, तसेच स्टेरॉइड औषधी व

xanthine oxidase inhibitor, uricosurics drugs या प्रकारातील औषधी वापरली जातात परंतु या औषंधामुळे होणार्या पोटातील अल्सर, किड्नीवर दुष्परीणाम यांसारख्या साइड-इफेक्ट्स मुळे जगातील बहुतांशी लोक नैसर्गीक चिकित्सा पद्धतीचा वापर या विकारासाठी करतात.

आयुर्वेदामधे वातरक्ताच्या चिकित्सेसाठी त्या साठी कारणीभुत दुषीत रक्त व त्यास आवरण करणारा वात या दोघांची चिकित्सा केली जाते, यासाठी विरेचन, रक्तमोक्षण, बस्ती यांसारख्या पंचकर्माचा वापर केला जातो. तसेच बाह्य लेप, स्वेद (शेक) व उपनाहसाठी शेवगा व एरण्ड पत्र, एरण्ड बीज, वरुण त्वक, निम्ब यांचा वापर केला जातो. अभ्यंतर औषधींमध्ये कोकिलाक्ष, गुळवेल, हरीतकी, वासा, ज्येष्ठ्मध यांसारख्या औषधांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो.

यासोबताच जीवनशैली मधे देखिल सुधारणा करणे गरजेचे असते, त्यात मद्यसेवन टाळणे, जेवनाच्या वेळा नियमीत व योग्य ठेवणे, वजन प्रमानात ठेवन्यासाठी व्यायाम यांचा समावेश होतो.

प्युरीन हा घटक असलेले खालील पदार्थ देखिल आहारातुन टाळणे गरजेचे असते.

-    दाळ, दाळीचे सर्व पदार्थ,

- प्रोटीन व फॅट्स युक्त आहार 

- तळलेले पदार्थ, अंबट पदार्थ, लोणचे,

- मांसाहार, अंडे, मासे, शेंगदाने, गुळ

- सिगारेट, तंबाखु, मद्य यांचे सेवन 

- मुळा, बटाटे, कोबी, चिंच, शीळे पदार्थ



  

-- डॉ.योगेश शिवाजी चव्हाण, एम.डी.(आयु.) केरळ.

  आयुष्मान भव आयुर्वेद व केरळीय पंचकर्म क्लिनिक,

Comments


bottom of page